Enter

उपदेश
 " हे भक्ता"
तु सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो,
माझे पुजन कर आणि फक्त मलाच नमस्कार कर.
माझ्यामध्ये पूर्ण रममाण हो, म्हणजे तु निश्चित मला प्राप्त करशील ।

तु जे जे कर्म करतोस, जे जे खातो, जे जे हवन करतोस, दान करतोस
आणि तु जे जे जप, तप करतोस ते ते सर्व तु मला अर्पण कर ।

तु सर्व प्रकारच्या धर्माचे पालन कर आणि केवळ मलाच पुर्णपणे शरण ये,
मी तुला सर्व पापातुन मुक्त करीन. तु भयभीत होऊ नकोस, तु चिंता करू नकोस,
तु संकोच करू नकोस, तुला माझ्याच कृपेने दिव्य शांती आणि
सनातन परमात्म्याची प्राप्ती होईल ।

तु सर्व कर्मामध्ये माझाच आश्रय घे, आणि भक्तियोगामध्ये पुर्णतया माझ्या भावनेने युक्त हो,
म्हणजे माझ्या कृपेने तु या बाह्य जीवनातील सर्व संकटे पार करशील ।

तुला माहित आहे मी कोणाचा व्देष करीत नाही,
कोणाशी पक्षपात करीत नाही. मला सर्वजण सारखेच आहे.
परंतु जो कोणी भक्तीभावाने माझी सेवा करतो, मला प्रेमाने, भक्तिने पान, फुल, फळ, पाणी अर्पण करतो
तो माझा अतिप्रिय भक्तमित्र आहे. तोच माझ्या ठायी स्थित होतो आणि मी सुध्दा त्याचाच होतो.
जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यामध्ये पाहते त्याला मी कधीच दुरावत नाही ।

जो पुर्ण ज्ञानी आहे आणि नित्य भगवत भक्तीमध्ये युक्त आहे तो सर्वोत्तम आहे,
कारण मी त्याला अत्यंत प्रिय आहे
आणि तो मला अत्यंत प्रिय आहे. जो माझ्या भावनेमध्ये स्थित आहे आणि दृढ निश्चयाने....

।। हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ।।
।। हरे राम, हरे राम, राम राम हरे हरे ।।

या महामंत्राचा जप करण्यात मग्न झालेला असेल तो दिव्य अवस्था प्राप्त करतो ।

।। जय जय श्री राधे ।।